श्री स्वामी समर्थ ग्रा.बिगर शेति सह. पत संस्था मर्या. सोनई, ता. नेवासा जि. अहमदनगर. सभासद :- संस्थेचे १५४४ अ वर्ग सभासद व ७२७१ ब वर्ग सभासद आहेत. दि. ३१.०३.२०१३ अखेर संस्थेचे वसूल भागभांडवल रू. २१.२८ लाख आहे. निधी :- संस्थेकडे राखीव निधी रू. ५०. ५९ लाख, इमारत निधी ३३.३४ लाख, कर्मचारी कल्याण निधी ४ लाख १४ हजार,सभासद कल्याण निधी ४ लाख ६६ हजार व एन. पी.ए. तरतूद निधी २८७.०५ लाख असे एकुण रू.३८०. १० लाखाचा स्वनिधी संस्थेने उभा केला आहे . कर्ज :- संस्थेने आर्थिक वर्षाअखेर स्थावर तारण कर्ज,वाहन तारण कर्ज,पगारदार,नोकर कर्ज,आकस्मित कर्ज,सामान्य तारण कर्ज,सोनेतारण कर्ज मिळून एकूण रू. २५८८.८५ लाख कर्ज वितरण केले आहे. मालमत्ता: संस्थेकडे इलेक्ट्रिक पंप,फ़र्निचर,डेडस्टोक,कॉम्पुटरर्स,कार्यालयीन जागा, मारतवालकंपाउंड, तिजोरी,महिंद्रा जिप ,अ.नगर (नवि पेठ ) येथे कार्यालयासाठी स्वमालकीची जागा अशी एकुण रु.५४ लाख ६३ हजाराची स्थावर मालमत्ता आहे. गुंतवणुक:- संस्थेने ए.डी.सी. बॅंक सोनई शाखा - नेवासा, शाखा - करंजगाव ,शाका - अ.नगर, शाखा तिसगाव, राहुरी, मुळा सह.बंक सोनई व नेवासा या बँकेत एकुण १५८६.८० लाख गुंतवणुक केलेली आहे. तरलता:- संस्थेने सन २०१०-११ या वर्ष करिता ऑडीट नियमावली व शासनाचे नियमाप्रमाणे गुंतवणु करून ४२% तरलता ठेवली आहे. त्यामुळे संस्थेची आर्थिक परिस्थिती पूर्ण सुरक्षित आहे. सी.डी.रेशो :-संस्थेने ऑडीट नियमावली व शासन नियमानुसार ६०% ते ७०% सी.डी.रेशो पाहिजे. त्यानुसार संस्थेचा सीडी रेशो ६८% आहे. हा आदर्श सी. डी. रेशो संस्थेने मागिल वर्षी कायम ठेवला आहे. |
श्री स्वामी समर्थ ग्रामीन बिगर शेति सह. पत संस्था मर्यादित थकबाकी :-एकूण येणे कर्जापैकी ५५२.०८ लाख थकबाकी असून तिचे टक्केवारी प्रमाण ५५ टक्के असून एकूण थकीत कर्जदार संख्या ९०५ आहे. या कर्जदारापैकी ८०९ थकीत कर्जदारावर १०१ ची कार्यवाही केली असून कलम ९१ खाली सहकार कोर्टात ६६ थकित कर्जदारावर व ८४ थकित कर्जदारावर कलम १३८ च्या खाली मे. कोर्टामध्ये केसेस चालू आहेत. सन २०१२-२०१३ या वर्षात मागील वर्षाच्या थकबाकीतून २ कोटी १९ लाख रोख कर्ज वसूल केला आहे. त्यामध्ये मुळा सह.साखर कारखाना सोनई यांनी ऊस पेमेंट मधून ५७ लाख ९५ हजार वसूल झाला आहे. मुळा एज्युकेशन कर्मचारी पगारातून ७ लाख ८० हजार असे एकुण कर्ज वसुल झाले आहे. एकरकमी कर्जफेड योजना :-या योजनेअंतर्गत संस्थेने ३१/०३/१३ या साला अखेर २२८ पूर्ण थकीत कर्जदारांना रू ३४ लाख ४९ हजार रुपये इतकी सूट दिली आहे. एन.पी.ए. :- संस्थेने थकीत कर्ज व थकव्याजापोटी २८७.०५ लाखाची तरतूद करून ठेवली आहे. लाभांश :- संस्थेने सभासदांना सालाबादप्रमाणे १० टक्क्यांनी लाभांश जाहीर केला असुन सदर लाभांश रक्कम रु.२ लाख ५६ हजार ७४६रु. आहे. आभार :-संस्थेला आर्थिक वर्षात ज्या संचालक, सभासद ,ठेवीदार , कर्जदार, कर्मचारी वृंद, डेली ठेव प्रतिनिधी, हितचिंतक ज्ञात ,अज्ञात व्यक्ती यांनी संस्थेत ठेवी ठेवण्यासाठी तसेच कर्ज वसुलीसाठी संस्थेला जे सहकार्य केले आहे त्याबददल संस्था त्यांची सदैव ऋणी राहील.
आपला |
|